नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नर्मदा-राजपिपला (गुजरात राज्य) जिल्ह्यात 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित होणाऱ्या जिल्हा पंचायत, तालुका पंचायत तसेच नगरपालिका निवडणुक-2021 कार्यक्रमाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील गुजरात राज्यास सिमेलगत असलेल्या  मौजे गव्हाली, पोरंबी, खडकापाणी, उदयपुर, कोराई व खापर ता.अक्क्लकुवा या ठिकाणी  मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

मतदानाच पूर्वीचा एक दिवस 26 फेब्रूवारी 2021 संध्याकाळ 6 वाजेपासून (मतदानाचा दिवस) 28 फेबूवारी संपूर्ण दिवस आणि मतमोजणीचा दिवस 2 मार्च 2021 रोजी संपूर्ण दिवस महाराष्ट्र दारुबंदी कायदा-1949 मधील तरतुदीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील गुजरात सिमेलगत असलेली वरील गावातील सर्व मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात.  आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.