नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार 17 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 6.30 वाजता निवासस्थानी आगमन व राखीव. रविवार 18 सप्टेंबर 2022 रोजी नंदुरबार निवासस्थानी राखीव. (स्थळ- 6, विरल विहार, खोडाईमाता रोड, नंदुरबार). 

सोमवार 19 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील कामकाजाचा आढावा तसेच विविध विभागांना देण्यात येणाऱ्या निधीचा आढावा. दुपारी 2 वाजता तळोदा प्रकल्प कार्यालयातील कामकाजाचा आढावा तसेच विविध विभागांना देण्यात येणाऱ्या निधीचा आढावा. रात्री नंदुरबार येथे मुक्काम.