नंदुरबार (प्रतिनिधी) – कोविड-19 प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती पुढे येत असून शासकीय सेवेत असलेल्या शैलंद्र मराठे आणि माधुरी इंगळे या भाऊबहिणीच्या जोडीने या कार्यासाठी 14 हजार 200 रुपये देऊन आदर्श घालून दिला आहे. दोघांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचेकडे धनादेश सादर केले.

माधुरी या जिल्हा शासकीय रुग्णालयात डायलिसिस टेक्निशिअन आहेत. त्यांनी वाढदिवसानिमित्त वेतनाच्या 25 टक्के 4000 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले.  शैलेंद्र यांनी बहिणीकडून प्रेरणा घेत 10 हजार 200 रुपयांचे योगदान दिले. ते स्वते: राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक जाणिवेतून ही मदत केल्याचे शैलेंद्र यांनी सांगितले.