नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा) : बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी जन्मानंतर एक तासाच्या आत स्तनपान करू देणे आवश्यक आहे. आईचे पहिले पिवळे घट्ट दूध बाळासाठी पहिली लस असते. जन्मानंतर तात्काळ आईच्या घट्ट दुधात असणाऱ्या घटकांद्वारे बाळाला जीवनदायी संरक्षण मिळते. स्तनपान करु दिल्यामुळे आईच्या शरीरात दूध बनण्याच्या प्रक्रियेत वेग येतो आणि त्यामुळे आईसोबत बाळाचं नातं मजबूत होत.

स्तनपान हे बाळातपणानंतर होणारा रक्तस्त्राव कमी करत. जन्मानंतर एका तासाच्या आत फक्त आईचे दूध पाजावे. सहा महिन्यांपर्यंत पाणी, मध, घुट्टी गाय किंवा बकरीचे दूध, पावडरचे दूध, सेरेलॅक किंवा नेस्टम इत्यादी बाहेरच्या गोष्टी देणे बाळासाठी हानीकारक होऊ शकते. बाळाचा जन्म  ऑपरेशनने झाला असला तरीही जन्मानंतर एका तासाच्या आत बाळाला दूध पाजू शकता. जर बाळ स्तनपान करत नसेल तर त्याला त्वरीत आरोग्य केंद्रात घेऊन जावे.

सहा महिन्यांनतर बाळाला रोज दोन ते तीन वाट्या वरचा (बाकीचा) आहार द्यावा. त्यात घट्ट वरणासोबत भात, खिचडी, हिरव्या पालेभाज्या, पिवळी/नारंगी फळं आणि भाज्या,  दुधापासून बनवलेले खाद्यपदार्थ आणि तेल-तूप अशा पदार्थांचा समावेश असावा.

बाळाचं आरोग्य आणि प्रगतीसाठी, घट्ट वरणासोबत भात, खिचडी, हिरव्या पालेभाज्या, पिवळी/नारंगी फळं आणि भाज्या, दुधापासून बनवलेले खाद्यपदार्थ बाळाला खायला देणं आवश्यक आहे. सहा महिने पूर्ण झाल्यानंतर फक्त स्तनपान बाळाच्या पोषणासाठी पुरेस ठरत नाही.  या कालावधीत योग्य प्रमाणात वरचा (बाकीचा ) आहार न मिळाल्यास बाळाच्या प्रगतीवर वाईट परिणाम होतो आणि ते आजारी आणि कुपोषित होऊ शकतं.

वाढत्या बाळाला घरात उपलब्ध असलेले सगळ्या प्रकारचे पदार्थ खायला द्या, ज्यामुळे त्याला लागणाऱ्या पोषक घटकांची आवश्यकता पूर्ण होऊ शकेल. मांसाहारी कुटुंबात खाल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्येही असे पोषक घटक असतात.

वयानुसार वरच्या आहारात बदल करणे आवश्यक असते. सुरुवात मऊशीर किंवा नरम वरच्या (बाकीच्या) आहाराने करा, असे खाणे बाळाला सहज जाते. बाळाला बिनमसाल्याचं वरण किंवा इतर धान्यपदार्थ चांगल्या प्रकारे शिजवून खायला घाला. पहिले एक-दोन दिवस 3-4 चमचे खायला घालण्यापासून सुरुवात करा.  हळूहळू खाण्याचं प्रमाण वाढवून काही दिवसांत दोन वेळा एक-एक वाटी (सुमारे 100 ग्रॅम) आहार द्या.

बाळ एका दिवसाला दोन वाटी वरचा (बाकीचा) आहार, जसं की घट्ट वरणासोबत भात, खिचडी, हिरव्या पालेभाज्या, पिवळी/नारंगी फळं आणि भाज्या, दुधापासून बनवलेले खाद्यपदार्थ आणि तेल-तूप घेत आहे याची खात्री करा.

नऊ ते अकरा महिन्याच्या बाळासाठी एका दिवसाला दोन वाट्या वरचा (बाकीचा) आहार, जसे की घट्ट वरणासोबत भात, खिचडी, हिरव्या पालेभाज्या, पिवळी/नारंगी फळं आणि भाज्या, दुधापासून बनवलेले खाद्यपदार्थ आणि तेल-तूप घेत आहे याची खात्री करा. वयानुसार या प्रमाणात वाढ करावी लागते.

सुरुवातीला वरचा (बाकीचा) आहार घेताना बाळाला थोडा वेळ लागू शकतो.  अशा वेळी तुम्ही तुमचा संयम ठेवा. बाळाला नेहमी एका वेगळ्या वाटीतून जेवण द्या, ज्यामुळे ते किती जेवलं आहे त्याचं प्रमाण कळू शकेल.  बाळाला फक्त तासाच्या प्रमाणात नव्हे तर त्याला खेळत-खेळवत आणि प्रोत्साहन देत जेवायला घाला.

बाळाला जेवू घालतांना (भरवताना) नेहमी त्यांच्या मागे रहावे लागते, ज्यामुळे तुमची दमछाक होते, पण तरीही त्याला खाऊ घालणे आवश्यक असते. बाळाला जेवू घालताना (भरवतांना) घरातल्या इतर सदस्यांचीही मदत घ्या, कारण तुम्ही घरातल्या कामात व्यस्त असता.  अशा वेळी बाळाला खाऊ घालणं कठीण होते.

बाळ आजारी पडल्यानंतर वरच्या (बाकीच्या) आहाराचं प्रमाण वाढवा, ज्यामुळे त्याचं घटलेलं वजन आणि शक्ती त्याला पुन्हा मिळू शकेल. बाळाचे जेवण बनवण्यापूर्वी आणि ते त्याला भरवण्यापूर्वी हात चांगल्या प्रकारे साबणाने धुवून घ्या.  बाळाचेही हात धुवा. वरच्या आहाराबरोबरच बाळाला दिवसरात्र दूध पाजणेही आवश्यक आहे.  त्यामुळे बाळाला महत्वाचे पोषक घटक मिळतात आणि तुमच्याबरोबर त्याचे नातेही प्रस्थापित होत.  ते बाळाच्या संपूर्ण विकासासाठी आवश्यक असते.