नंदुरबार (प्रतिनिधी) :- तालुक्यातील चौपाळे येथील पी . जी . पब्लिक स्कूलचा इ १० वी सी . बी . एस . ई बोर्डाचा निकाल आज दिनांक जाहिर करण्यात आला. यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.


सिबीएससी बोर्डाचा इयत्ता १० विचा निकाल आज जाहीर झाला असून, पी जी पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी त्यात घवघवीत यश संपादिले आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षा पासून या शाळेत इ . ११ वी सायन्स व कॉमर्सची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री . पुष्पेंद्र रघुवंशी , श्री . सिध्दार्थ रघुवंशी, अॅड , रूद्रप्रताप रघुवंशी , तसेच प्राचार्य आनंद रघुवंशी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा – यांनी कौतुक केले . विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये नाव कृष्णा सुर्यकांत पंजराले, कृतिका अनिल पतिल, मनुदिप दिपकसिंग गिरासे, प्रतिक्षा चंद्रकांत धनगर, कपिल प्रविण मराठे, मुकेश गिरिश पतिल, योगाली जितेंद्र बोरसे, पलक अजय परदेशी, प्रज्ञेश विजय मराठे, रिया निमेश गोसालीया या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.