नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पिंपळखुटा अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी संबंधित महसुली गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून 6 जुलै 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकात्मिक बालविकास सेवा योजना पिंपळखुटा प्रकल्पातंर्गत जुगलखेत आणि अरेठी येथील अंगणवाडी केंद्रातील 2 अंगणवाडी सेविका रिक्त पदासाठी अर्ज  मागविण्यात आले आहेत.

तसेच उखर्डी पाडा, पलासखोब्रा, डनेल-2, वेहगी, पांढरामाती, अरेठी, चिमलखेडी अंगणवाडी केंद्रातील मदतनीसाच्या 7 रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी  केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, पिंपळखुटा, पंचायत समिती, ता.अक्कलकुवा येथे  संपर्क साधावा.