नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार 10 फेब्रूवारी 2021 रोजी दुपारी 02.30 वाजता नाशिक येथून असली ता. धडगांवकडे प्रयाण व असली येथे मुक्काम.  गुरुवार 11 फेब्रूवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता अस्तंबा परिसराची पाहणी, दुपारी राखीव.  शुक्रवार 12 फेब्रूवारी 2021 रोजी सकाळी 12.00 वाजता अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथील मयत शेतकरी आंदोलक महिला सिताबाई रामदास तडवी यांच्या कुटुंबियांना भेट.  दुपारी राखीव व मुक्काम.