नंदुरबार   राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा‍ जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

        शनिवार 31 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 2.30 वाजता नाशिक येथून सारंगखेडाकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता अत्याचारग्रस्त मुलीच्या कुटुंबियांची भेट. 6.30 वाजता सारंगखेडा येथून नंदुरबारकडे प्रयाण व नंदुरबार येथे मुक्काम.

            रविवार 1 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता शहादाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता शहादा येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समवेत शासकीय विश्रामगृह शहादा येथे जिल्ह्यातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा, त्यानंतर सोईनुसार नंदुरबारकडे प्रयाण.

            सोमवार 2 नोव्हेंबर 2020 रोजी नंदुरबार येथे राखीव. गुरुवार 5 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता नंदुरबार येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे आयोजित रॅलीत सहभाग. सायंकाळी 4.00 वाजता वाहनाने जळगावकडे प्रयाण.