नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा‍ जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार 21 मे 2021 रोजी शासकीय वाहनाने नंदुरबार येथे आगमन व मुक्काम. शनिवार 22 मे 2021 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार  येथे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक. विषय- कोरोना व म्युकर मायकोसिस यासाठी मार्च 2020 पासून उपलब्ध झालेला शासकीय निधी व त्यातून करण्यात आलेल्या उपाययोजना, लसीकरणाची स्थिती, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्वतयारी व आवश्यक निधीचे नियोजन, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा.  दुपारी 1 वाजता कृषि व बी-बियाणे, खते स्थिती आणि  याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेली कारवाई, शबरी आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, पीक कर्ज वाटप, बँकींग सेवा याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक.

रविवार 23 मे 2021 रोजी असली ता.धडगाव येथे राखीव.  सोमवार 24 मे 2021 रोजी अक्कलकुवा येथे राखीव. मंगळवार 25 मे 2021 रोजी नंदुरबार येथे राखीव. दुपारी 2 वाजता शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण.