नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील सर्व राज्यशासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटूंब निवृत्तीवेतनधारकांचे माहे मार्च 2022 चे निवृत्तीवेतन मार्च अखेरीस आर्थिक लेख्यांचे  कामकाज पुर्ण करावयाचे असल्याने 5 एप्रिल 2022 नंतर संबंधित बँकेत पाठविण्यात येईल. याबाबत सर्व निवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे.