नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातून नव्याने निवडून आलेल्या सदस्यांपैकी जिल्हा नियोजन समितीमधील 20 सदस्यांच्या निवडणूकीसाठी मतदार याद्यांची प्रसिद्धी 3 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हा परिषदेच्या सूचना फलकावर करण्यात आली आहे.

ग्रामीण निर्वाचन क्षेत्रात प्रत्यक्ष निवडणूकीत सहभागी होऊन निवडून आलेले जि.प. सदस्य हे मतदार आहेत. मतदार यादीबाबत संबंधितांच्या हरकती असल्यास लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी नंदुरबार यांचेकडे प्रसिद्धी दिनांकापासून तीन दिवसात सादर कराव्यात. तीन दिवसानंतर प्राप्त झालेल्या हरकतीबाबत कुठल्याही प्रकारची नोंद घेण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कळविले आहे.