नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : अल्पसंख्यांक कल्याणाकरिता पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीची पुर्नरचना करण्यासाठी ग्रामीण तसेच नागरी क्षेत्रातील अल्पसंख्याक कल्याणाशी संबधित स्थानिक पंचायतराज संस्थांचे प्रतिनिधी आणि  जिल्ह्यातील अल्पसंख्यांकासाठी काम करणाऱ्या 3 नामवंत अशासकीय स्वंयसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची नामनिर्देशने अल्पसंख्याक विकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत.  इच्छुकांनी नामनिर्देशनासाठी आपले प्रस्ताव 8 ऑक्टोंबर 2020 रोजी  सायंकाळी  5 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय (सामान्य शाखा ) जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे सादर करावे,  असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.