नंदुरबार (प्रतिनिधी)- नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील नमुद करण्यात आलेल्या सर्व बाबींची माहिती शिक्षण क्षेत्राशी निगडीत सर्व घटकांना होणे आवश्य्क आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने आयोजीत केलेल्या वेबिनारचा नक्कीच सर्वांना उपयोग होईल, असा विश्वास नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य् कार्यकारी अधिकारी श्री. रघुनाथ गावडे यांनी व्यक्त् केला. नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद, शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यामिक) यांच्या संयुक्त् विद्यमाने आयोजित वेबिनार मालीकेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रेरणेने व संचालक, मिपा, औरंगाबाद यांच्या निर्देशानुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यामिक) जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) या विषयावरील वेबिनार मालिकेचे दिनांक 11 ते 13 जानेवारी या कालावधीत यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
वेबिनारचे औपचारीक उद्घाटन करतांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील नमुद करण्यात आलेल्या सर्व बाबींची माहिती शिक्षण क्षेत्राशी निगडीत सर्व घटकांना होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने आयोजीत केलेल्या वेबिनारचा नक्कीच सर्वांना उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त् करतांनाच शिक्षण विभागातील अधिकारी व मुख्याध्यापक, शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
या वेबिनारला डॉ. नेहा बेलसरे, संचालक मिपा, औरंगाबाद, श्री. नितीन उपासनी, शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग, नाशिक या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. राज्य स्तरावरील शिक्षण तज्ञ श्री निलेश निमकर संचालक, क्वेस्ट संस्था पालघर, यांनी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, डॉ. कविता साळुंखे संचालक, शिक्षणशास्त्र विद्याशाखा, YCMOU, नाशिक, यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व प्राथमिक शिक्षण, श्री संदीप वाकचौरे विषय सहायक, डायट, संगमनेर यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची आव्हाने इत्यादी विषयांवर सखोल व विस्तृत मार्गदर्शन केले.
या वेबिनारमध्ये डायट नंदुरबार, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार, आदिवासी विकास प्रकल्प- नंदुरबार व तळोदा, महिला बाल विकास प्रकल्प, जिल्हा परिषद नंदुरबार, समाज कल्याण विभाग, अशा विविध विभागांतील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षण प्रेमी यांनी सहभाग नोंदवला.
या संपूर्ण वेबिनार मालिकेचे युट्युब लाईव्ह द्वारे प्रक्षेपण करण्यात आले. केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर समग्र महाराष्ट्रातील 3600 लोकांनी हा कार्यक्रम लाईव्ह पाहिला. तीन दिवस प्रक्षेपित करण्यात आलेला हा कार्यक्रम युट्युब द्वारे आतापर्यंत एकूण 20 हजार वेळा पहिला गेला.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत प्रतिसाद नोंदणी केलेल्या सहभागी व्यक्तींसाठी ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वेबिनारच्या यशस्वितेसाठी डॉ. जगराम भटकर, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार, श्री एम. व्ही. कदम शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद, नंदुरबार, श्री बी. आर. रोकडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नंदुरबार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नोडल अधिकारी म्हणून वरीष्ठ अधिव्याख्याता श्री प्रवीण चव्हाण यांनी जबाबदारी सांभळली. तर वरिष्ठ अधिव्याख्याता श्री रमेश चौधरी, अधिव्याख्याता श्री बी आर पाटील, डॉ. वनमाला पवार, श्री पंढरीनाथ जाधव, डॉ. संदीप मुळे व सर्व विषय सहायक यांनी यासाठी परिश्रम घेतले.