नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील रघुवंशी समाजाचे ज्येष्ठ नागरिक गजेंद्रसिंह  गोविंदसिंग उर्फ गजू काका हजारी (वय८५)  यांचे बुधवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी पहाटे ४:३० वाजता अल्पशा आजाराने  सुरत येथे उपचार सुरू असताना निधन झाले. 

त्यांच्या पश्चात  पत्नी, एक मुलगा, सुन, ४ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. रत्नाभाभी रघुवंशी आणि यशवंत विद्यालयाचे प्रा. अरुण हजारी यांचे वडील तसेच जेष्ठ विधीज्ञ ॲड . राजेंद्र रघुवंशी, माजी आमदार व शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी, नगरसेवक अमित रघुवंशी, लायन्स क्लबचे  माजी अध्यक्ष आनंद रघुवंशी यांचे ते सासरे होते. ॲड . रोहित अरूणसिंह हजारी यांचे ते आजोबा होते. कै. गजूकाका हजारी यांच्या पार्थिवावर सुरत येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .