नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा माहिती कार्यालय नंदुरबार व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारासाठी छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर नंदुरबार येथे मोफत कोविड 19 चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

           यावेळी रणजित राजपूत, हिरालाल चौधरी, जगदीश जयस्वाल, निलेश पवार, मनोज शेलार, राकेश कलाल, महादु हिरणवळे, सुनिल कुळकर्णी, धनराज माळी, अविनाश भामरे, किशोर गवळी, भावेश मराठे, अतुल थोरात, अमित कापडणे, मनोज कुलथे, वैभव करवंदकर, ज्ञानेश्वर माळी, भिकेश पाटील, गौतम बैसाणे आदी उपस्थित होते.

            या शिबिरात एकूण 38 व्यक्तिंची कोविड चाचणी करण्यात आली.  यात पत्रकार, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींचा समावेश होता. जिल्हा शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधिकारी पथक डॉ. मनीष नाद्रे, डॉ.अश्विनी देसले, डॉ.जागृती परमार,परिचारीका ए.एस.गवळी यांनी चाचणीसाठी सहकार्य केले. यावेळी सोशल डिस्टींगसह मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यात आला. या चाचणीसाठी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि नंदुरबार नगरपालिकेचे सहकार्य लाभले.