नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्यातर्फे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 1 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या महोत्सवात इच्छुक कलावंत, स्पर्धकांनी  सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे.

             युवकांमध्ये एकात्मकतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून  युवा वर्गातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी युवा महोत्सवाचे आयेाजन करण्यात येते. या युवा महोत्सवात लोकनृत्य 20 कलाकार संख्या, लोकगीत 10 कलाकार संख्या या दोन प्रकारात स्पर्धा होईल. यासाठी जिल्ह्यातील 15 ते 29 वर्ष वयोगटातील 31 डिसेंबर 2021 पर्यंत प्रवेश अर्ज [email protected] या ई-मेलवर सादर करावे. प्रवेश अर्ज सादर करताना अर्जावर व्हॉट्सॲप क्रमांक असणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी जगदीश चौधरी (9422834187 ) यांच्याशी संपर्क साधावा.