नंदुरबार(प्रतिनिधी) :- जिल्हा पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागाने सॅनिटराझर व्हँनची निर्मीती केली असुन, या व्हॅन मधुन अधिकारी कर्मचाना कर्णाचाऱ्याना निर्जतुकरण केले जाणार आहे. अवघ्या २४ तासात तयार केलेली ही व्हॅन विविध तपासणी नाक्यांवर कार्यरत राहणार आहे. विशेष म्हणजे अशाच पद्धतीने यासोबतच दुसऱ्या एका सॅनेटायझर व्हॅनची निर्मीती केली जाणार आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक श्री रमेश पवार यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्य्याच्या सीमा या गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांना लागुन असल्यासोबतच अतिदुर्गम भागात देखील या सीमा आहेत. अश्या ठिकाणी कार्यरत राहण्यासाठी या व्हॅन मधील सँनेटायझर यंत्रणा हि इन्वर्टरवर सुद्धा कार्यन्वीत राहु शकते, अशा पद्धतीची सोय यात करण्यात आली आहे. नुकतीच जिल्हा पोलीस मुख्यालयात या व्हॅनची चाचणी घेण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत असतांनाच पोलीस दलात दाखल झालेल्या या फिरत्या सॅनेटायझर व्हॅनमुळे दिवसरात्र रस्त्यावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस दलातील जवानांना विशेष सुरक्षेसोबतच मानसिक आधार मिळणार आहे. स्थानिक गुन्हा अनवेशन शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किशोर नवले व मुख्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

नंदुरबार पोलिंसाची सॅनिटायझेशन व्हॅननंदुरबार(प्रतिनिधी) :- जिल्हा पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागाने सॅनिटराझर व्हँनची निर्मीती केली असुन, या व्हॅन मधुन अधिकारी कर्मचाना कर्णाचाऱ्याना निर्जतुकरण केले जाणार आहे. अवघ्या २४ तासात तयार केलेली ही व्हॅन विविध तपासणी नाक्यांवर कार्यरत राहणार आहे. विशेष म्हणजे अशाच पद्धतीने यासोबतच दुसऱ्या एका सॅनेटायझर व्हॅनची निर्मीती केली जाणार आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक श्री रमेश पवार यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्य्याच्या सीमा या गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांना लागुन असल्यासोबतच अतिदुर्गम भागात देखील या सीमा आहेत. अश्या ठिकाणी कार्यरत राहण्यासाठी या व्हॅन मधील सँनेटायझर यंत्रणा हि इन्वर्टरवर सुद्धा कार्यन्वीत राहु शकते, अशा पद्धतीची सोय यात करण्यात आली आहे. नुकतीच जिल्हा पोलीस मुख्यालयात या व्हॅनची चाचणी घेण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत असतांनाच पोलीस दलात दाखल झालेल्या या फिरत्या सॅनेटायझर व्हॅनमुळे दिवसरात्र रस्त्यावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस दलातील जवानांना विशेष सुरक्षेसोबतच मानसिक आधार मिळणार आहे. स्थानिक गुन्हा अनवेशन शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किशोर नवले व मुख्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Posted by NsevenNews Ndb on Friday, 10 April 2020