गुजरभवानी गणातून धर्मेंद्रसिंह परदेशी 931 मतांनी विजयी

नंदुरबार- (जगदीश ठाकुर)
नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतमोजणीला आज बुधवारी सकाळी दहा वाजेपासून जिल्हाभरातील तहसील कार्यालयामध्ये सुरुवात झाली आहे. नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुल मध्ये मतमोजणी प्रक्रिया घेण्यात येत आहे. नंदुरबार तालुक्यात मतमोजणीतून सुरुवातीलाच शिवसेनेने गणामध्ये खाते उघडले आहे. नंदुरबार तालुक्यातील गुजरभवानी गणातून शिवसेनेचे उमेदवार धर्मेंद्रसिंह परदेशी हे 931 मतांनी विजयी झाल्याची माहिती मिळाली आहे.