नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासनाच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयाने सन 2019 मधील तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार (TNNAA) प्रदान करण्यासाठी  खेळाडूंनी 20 जून पर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे आहेत.

पुरस्कारासाठी नामांकन सादर करणाऱ्या खेळांडूची कामगिरी सन 2017, 2018, 2019 या तीन वर्षातील असणे आवश्यक आहे. साहसी उपक्रम हे जमीन,पाणी, व हवेमधील असणे आवश्यक राहील. खेळाडूंची कामगिरी अतिउत्कृष्ट असावी. पुरस्काराबाबत अधिक माहिती व अर्ज करीता https:dbtyas-youth.gov.in  या संकेतस्थळावर 20 जून 2020 पर्यंत प्रस्ताव सादर करावे.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रिडा अधिकारी, साक्री नाका, खामगाव रोड, नंदुरबार येथे 10 जून 2020 पर्यंत संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले आहे.