नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी कार्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.