नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ज्येष्ठ नागरिकांचे अथवा माता-पिता यांना मूलभूत गरजा व सुविधा त्यांची मुले देत नसल्यास आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियमानुसार तक्रार करण्याचे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

या अधिनियमामध्ये आई वडिलांकडून प्राप्त मालमत्तेचे हस्तांतरण रद्द करणे, मासिक निर्वाह भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यानुसार  कार्यालयामार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या 4 प्रकरणांत संबंधित प्रतिवादी यांना पोलीस विभागामार्फत वारॅट बजाविण्यात आले आहे. तरी ज्येष्ठ नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास सहायक जिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी नंदुरबार भाग नंदुरबार,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा.