नंदुरबार (प्रतिनिधी) -येथील पालिकेचे निवृत्त आरोग्य निरीक्षक तथा िनवृत्त प्रभारी जकात अधिक्षक ज्ञानदेव जयसिंग राजपूत यांनी पंतप्रधान सहाय्य निधीत २१ हजार रूपयांचा धनादेश देऊन आर्थिक सहाय्य केले.
राजपूत हे १९९८ रोजी पालिकेतून निवृत्त झाले आहेत. कोरोनाशी मुकाबला करतांना राज्य व केंद्र शासनाकडे निधींची कमतरता आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधी देण्याचे आवाहन केले हाेते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत ज्ञानदेव राजपूत यांनी २१ हजाराचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपुर्द केला. जिल्हाधिकारी डॉ भारूड यांनी  राजपूत यांचे आभार मानले.
देशाने आपल्यावर खूप उपकार केलेत, एक कृतज्ञता म्हणून निधी देत आहे, असे राजपूत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहाय्ता निधी व पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्ते पुढे येत आहेत.