नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक-2022 कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत नवापूर तालुक्यातील निवडणूक विभाग क्र.52 चितवी व पंचायत समिती अंतर्गत अक्राणी तालुक्यातील निर्वाचक गण क्र.29 असली यांचा समावेश असून त्या अनुषंगाने जिल्हास्तरावर आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

         नागरीकांनी आचारसंहिता तक्रारीबाबत दूरध्वनी क्रमांक 02564-210007 वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता तक्रार निवारण कक्षाचे प्रमुख सुधीर खांदे यांनी केले आहे.