नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड  यांनी सन 2021 या वर्षाकरीता तीन दिवस स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.

आषाढी एकादशी मंगळवार 20 जुलै , विश्व आदिवासी दिवस सोमवार 9 ऑगस्ट तसेच घटस्थापना गुरुवार 7 ऑक्टोबर असे तीन दिवस जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना  (न्यायालयीन विभाग वगळून ) सुट्टी असणार आहे.