नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी 9 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत किरकोळ मद्य विक्री करणाऱ्या एफएल-2, एफएल-3, सीएल-3,सीएल/एफएल/टीओडी-3 आणि एफएल/बीआर-2 अशा सर्व अनुज्ञप्त्या बंद करण्याचे आदेशित केले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.