नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.22: जिल्ह्यात 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले असून त्यासाठी 15 केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अक्कलुवा ग्रामीण रुग्णालयात दररोज 150 (कंसातील आकडेवारी क्रमश: ऑनलाईन नोंदणी आणि ऑनस्पॉट लसीकरणाची  आहे. 50,100), धडगाव ग्रामीण रुग्णालय 160 (10, 150), झापी प्रा.आरोग्य केंद्र 150 (50, 100), चुलवड प्रा.आरोग्य केंद्र 200 (50, 150), तळोदा ग्रामीण  रुग्णालय 200 (100, 100), नवापूर ग्रामीण  रुग्णालय 200 (100, 100), चिंचपाडा प्रा.आरोग्य केंद्र 200 (50, 150), शहादा नागरी आरोग्य  केंद्र 200 (100, 100), प्रकाशा प्रा.आरोग्य केंद्र 200 (100, 100), कुसुमवाडा प्रा.आरोग्य केंद्र 150 (50, 100), वाघर्दे प्रा.आरोग्य केंद्र 200 (100, 100), जिल्हा शासकीय रुग्णालय नंदुरबार 200 (100, 100), जयप्रकाश नारायण नागरी आरोग्य  केंद्र नंदुरबार 200 (100, 100), माळीवाडा नागरी आरोग्य  केंद्र नंदुरबार 200 (100, 100) आणि तोरणमाळ ग्रामीण रुग्णालय येथे दररोज 150 नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

पूर्वीप्रमाणेच 30 वर्षावरील आणि 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण नियोजित केंद्रावर सुरू रहाणार आहे. 18 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात लसीचा पुरेशा प्रमाणात साठा आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जावून लसीकरण करून घ्यावे. लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.