नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सीवायडीए, फिनीश सोसायटी, नॅशनल स्टॉक एक्स्जेंज, जिल्हा परीषद नंदुरबार, राष्ट्रीय सेवा योजना आणि शहादा वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयातर्फे जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती रथाला  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी हिरवी झेंडी दाखवून उपक्रमाचा शुभारंभ केला.

 जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक रघुनाथ भोये, प्राचार्य शांताराम बडगुजर, प्रा.माधव कदम, सीवायडीएचे मनोज शेवाळे, वसीम शेख  आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी या उपप्रमाचे कौतुक केले. दुर्गम भागात लसीकरणाबाबत जनजागृतीची आवश्यकता असून युवकांच्या माध्यमातून नागरिकांमधील गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्यादृष्टीने चित्ररथ व बलूनद्वारे चांगली जनजागृती होईल असेही डॉ.भारुड यांनी सांगितले.