नंदुरबार (प्रतिनिधी):- जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या सर्व व्यक्तींनी प्रशासनाला माहिती देणे बंधनकारक असून अशी माहिती लपविणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. आशा व्यक्तींची माहिती देण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात आले असून, अश्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या देशात सर्वत्र कोरोना विषाणुचा संसर्ग मोठया प्रमाणावर झालेला आहे . नंदुरबार जिल्ह्यालगतचे . मालेगाव , नाशिक , जळगाव तसेच सेंधवा ( मध्यप्रदेश ) सरहद्दीवर कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले रुग्ण आढळुन आलेले आहेत. सदर परिसरातुन तसेच इतर राज्य व देश येथुनही मोठया प्रमाणावर नागरिक नंदुरबार जिल्ह्यात आलेले असल्याची दाट शक्यता आहे. यातुन नंदुरबार जिल्ह्यात कोरोना विषाणुचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, दिनांक ०९ एप्रिल २०२० पुर्वीच्या ०५ दिवस आधी जे नागरिक अन्य जिल्हा, राज्य, देश येथुनं नंदुरबार जिल्ह्यात वास्तव्यास आलेले असतील त्यांनी तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशन, स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक आरोग्य विभाग यांचेशी संपर्क साधुन त्यांचे प्रवासाबाबतची सर्व सत्य माहिती कळवावी. जेणेकरुन प्रशासनास त्यावर प्रभावी उपाययोजना करणे शक्य होईल. प्रशासनापासुन माहिती लपविणाऱ्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असे या पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, याद्वारे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, गेल्या पाच दिवसापुर्वीपासुन बाहेरुन आलेल्या सर्व व्यक्तीबाबत आपणास असलेली माहिती तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष , नंदुरबार येथे फोन क्र . ०२५६४२१०११३ या क्रमांकावर द्यावी . माहिती देणाऱऱ्याचे नाव व इतर माहिती गोपनीय ठेवण्यात येईल . तरी कोरोना विषाणुपासून आपल्या तसेच जनतेच्या आरोग्यास धोका उत्पन्न होवु नये , म्हणुन प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी याद्वारे केले आहे.