नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 आजार नियंत्रणासाठी शासन आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, कोरोना विषयक मार्गदर्शक सूचना आणि शासनाने घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांची माहिती जनतेला देण्यासाठी  जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शहादा तालुक्यात पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात लोककला पथकातर्फे जनजागृती मोहिमेची सुरुवात आज शहादा  तालुक्यातून करण्यात आली. तालुक्यातील बसस्थानक, लोणखेडा, म्हसावद तसेच प्रकाशा येथे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.