नंदुरबार, (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा परिषदेतील निवडणूक विभाग क्र.52 चितवी ता.नवापूर व अक्राणी पंचायत समितीमधील निर्वाचक गण क्रमांक 29 असली ता.अक्राणी मधील रिक्त जागेच्या पोटनिवडणूकीसाठी  मा.राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीत प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. असे नायब तहलिसदार (सामान्य) रामजी राठोड  यांनी कळविले आहे.

            सदर कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयातील सूचना फलकावर व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयातील संकेतस्थळावर 28 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीवर काही चूका असतील तर त्यासंदर्भात 28 एप्रिल 2022 ते 5  मे 2022 पर्यंत संबंधितांकडून हरकती व सूचना तहसिल कार्यालयात मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकती व सूचना विचारात घेऊन अधिसूचित केलेल्या तारखेस 11 मे 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.