नंदुरबार (प्रतिनिधी):- कोरोना (कोविड 19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांच्या आदेशानुसार जिल्हाभर शासकीय व सार्वजनिक इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच नंदुरबार जिल्हा परिषद इमारतीचेही निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी नुकतेच जिल्हाभरातील शाळा, ग्रामपंचायत यासह सर्व शासकीय निमशासकीय व सार्वजनिक इमारती औषधांची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावात औषध फवारणीचे काम हाती घेण्यात आले. त्याबरोबरच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इमारतीतही सोडियम हायपोक्लोराईड या रासायनिक द्रव्याची फवारणी करण्यात आली.

जिल्हा परिषद इमारतीच्या कानाकोपऱ्यात ही फवारणी करण्यात आली असून, जिल्हा परिषद पदाधिकारी निवास, जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत या भागातही निर्जंतुकीकरण प्रक्रिया करण्यात आली आहे. कोविड 19 म्हणजेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबरोबरच विविध उपाययोजना राबवून प्रयत्नांची पराकाष्ठा करत असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शेखर रौदळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) श्री भुपेंद्र बेडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पापु व स्व. तसेच महिला बालकल्याण) डॉ. वर्षा फडोळ बेडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( रोहयो) व जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री अनिकेत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्री. नितीन बोडके, शिक्षणाधिकारी (माध्य.) श्री मच्छिंद्र कदम, शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्री. भानुदास रोकडे, जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. एन. एल. बावा, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री डी. एच. चौधरी, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रदिप लाटे, जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. श्री. यु डी पाटील, कार्यकारी अभियंता लघुसिंचन श्री सुनील शिंदे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा श्री प्रमोद बडगुजर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यातील संपुर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी परिश्रम घेत आहेत.