नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :आर्थिक वर्षाअखेरीच्या अनुषंगाने महाराष्ट्र कोषागार नियम 1968 नुसार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्हा कोषागार कार्यालयास भेट देवून वार्षिंक तपासणी केली. यावेळी  जिल्हा कोषागार अधिकारी गजानन पाटील,परिविक्षाधीन जिल्हा कोषागार अधिकारी श्री.लिंगालोड, अपर कोषागार अधिकारी देविदास पाटील, उप कोषागार अधिकारी योगेश पगारे, रविंद्र भगत, लेखाधिकारी प्रकाश बनकर , अतुल ठाकुर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती. खत्री यांनी कोषागारातील सुरक्षा कक्षास भेट देवून उपलब्ध असलेला मुद्रांक साठा, जिल्ह्यातील एकूण शासकीय जमा व खर्चाबाबतची माहिती व तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. आर्थिक वर्षांअखेर असल्याने विविध शासकीय कार्यालयाकडून सादर होणाऱ्या देयकांचा निपटारा करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. तसेच भेटी दरम्यान जिल्हा कोषागार कार्यालयाच्या विविध विभागाची माहिती  श्री.गजानन पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.