नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी महेश सुधाळकर, बालाजी क्षीरसागर, तहसीलदार उल्हास देवरे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.