नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, नितीन सदगीर, तहसिलदार उल्हास देवरे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.