नंदुरबार (प्रतिनिधी) :- येथील जिजामाता शिक्षण संस्थेचे जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय नंदुरबार व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ( ८ मे २०२२) रोजी ” मराठी विज्ञानसाहित्य :– स्वरूप व्याप्ती व बदलते परिप्रेक्ष्य ” या नाविन्यपूर्ण विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे ऑफलाईन आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राचे उद्घाटन अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. मोना चिमोटे हे करणार आहेत तर यावेळी ज्येष्ठ विज्ञानसाहित्याचे अभ्यासक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय ढोले बीजभाषण करणार आहेत. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई दिलीपराव मोरे राहणार आहेत.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील व शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.ए.आर. राणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विक्रांत दिलीपराव मोरे, सचिव डॉ. अभिजीत दिलीपराव मोरे, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीश वेडू देवरे, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे हे चर्चासत्र चार सत्रात होणार आहे पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर फुला बागुल उपप्राचार्य एस पी डी एम महाविद्यालय शिरपूर हे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर सचिन गिरी नांदेड वंदना लव्हाळे जळगाव डॉक्टर युवराज पवार शिरपूर डॉक्टर सुरेश मालचे नाशिक यांचे निबंध वाचन होणार आहे दुसऱ्या सत्राच्या अध्यक्ष विज्ञान साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर सुरेंद्र सुदर्शन दिवसे चंद्रपूर हे राहणार आहेत श्री संतोष पाटील शिरपूर दत्तात्रय शिंदे नाशिक डॉक्टर हर्षदा पुराणिक शहादा श्री वेदांत बेहरे गोवा हे या सत्रात निबंध वाचन करणार आहेत चौथे व अंतिम सत्र हे खुले निबंध वाचन सत्र आहे या सत्राचे 17 अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शिंदे सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे हे राहणार आहेत यावेळी उपस्थित अभ्यासकांचे निबंध वाचन होईल चर्चासत्राच्या समारोपाचे अध्यक्ष डॉक्टर अभिजीत दिलीप राव मोरे सचिव जिजामाता शिक्षण संस्था नंदुरबार तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक प्राध्यापक चींमय घाईसास गोवा विद्यापीठ गोवा हे राहणार आहेत भारतातील विविध राज्यातील व महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील नामवंत समीक्षक, अभ्यास, संशोधक या राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दर्जेदार शोधनिबंध संपादित ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. या चर्चासत्रात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन चर्चासत्राचे समन्वयक तथा प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.