नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जात प्रमाणपत्रांची पडताळणी करुन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याची प्रक्रिया 1 ऑगस्ट 2020 पासून पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आलेली असून अर्जदारांनी ऑनलाईन अर्जामध्ये परिपूर्ण माहिती भरुन अर्जाची प्रिंट काढून विहीत मार्गाने पूर्वीप्रमाणेच सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत समितीस अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.

निवडणूक प्रकरणांच्या बाबतीत पूर्वीप्रमाणेच हस्तलिखित अर्ज सादर होण्याची शक्यता असल्याने अशी हस्तलिखित प्रकरणे जातपडताळणी समिती स्विकारणार नाही यांची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य राकेश पाटील यांनी केले आहे.