नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत ‘जलशक्ती अभियान’ कॅच द रेन 2022 मोहिम राबविण्यात येणार असून सदर मोहिमेचे उद्घाटन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवार 29 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजता  व्हिडीओ कॉन्फेरन्स  मार्फत होणार आहे.  

               या अभियानांतर्गत जल शपथ, प्रत्येक शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टरची कामे करणे, 1 ते 7 एप्रिल 2022 दरम्यान विशेष ग्रामसभा घेऊन अभियानाची माहिती देणे, जलस्त्रोताची महसुल दप्तरात नोंदी घेणे, जलस्त्रोत बळकटीकरण करणे, जलजीवनाची माहिती आदी कार्यक्रम आयोजित करावयाचे आहेत. या कार्यक्रमास नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी आपल्या ग्रामपंचायत स्तरावर प्रक्षेपित कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.