नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काल्लेखेतपाडा ता.धडगाव या शाळेचा शिक्षण क्षेत्रात सुशासनाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासाचे 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजेदरम्यान व्हर्च्युअल कार्यक्रमातंर्गत सादरीकरण करणार आहे.

या ग्लोबल शोकेस मध्ये सहभागासाठी http://bit.ly/2GnoVMGs   या लिंकवर नोंदणी करावी व सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) बी.आर.रोकडे यांनी केले आहे.

रजिस्ट्रेशनच्या तांत्रिक मदतीसाठी जिल्हा समन्वयक श्रीमती सोनल शिंदे (7887585807)  रविकांत ठाकरे (7774077968)  ग्यानप्रकाश फाऊन्डेशन,पुणे यांचेशी संपर्क साधावा.