नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 84 ग्रामपंचायतीमध्ये 111 सदस्यांच्या निवडणूकीसाठी गुरुवार 18 मे 2023 रोजी मतदान  तर शुक्रवार 19 मे 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळेृ जिल्ह्यातील ज्या गावांत ग्रामपंचायत निवडणूका असतील त्या मतदार क्षेत्रात गुरुवार 18 मे 2023 रोजी मतदानाच्या दिवशी तसेच शुक्रवार 19 मे 2023 रोजी मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्राच्या परिसरात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. या दिवशी भरविण्यात येणारे आठवडे बाजार अन्य दिवशी भरविण्यात यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.