नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : गृहनिर्माण सहकारी संस्थाना मालमत्तेचे मानिव अभिहस्तांतरण प्राप्त होण्यासाठी 1 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील सर्व गृहनिर्माण सहकारी संस्थाचे पदाधिकारी व सभासदांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रताप पाडवी यांनी केले आहे.

महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क अधिनियम 1963 मधील तरतुदीनुसार गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन झाल्यानंतर 4 महिन्यात विकासकाने इमारतीच्या जमिनीच्या मालकी हक्क संस्थेच्या नावे हस्तातरण करुन देणे बंधनकारक आहे. मोहिमेतर्गत गृहनिर्माण सहकारी संस्थाना विकासकाकडून जमिनीचे कायदेशिर मालकी हक्क प्राप्त होणार आहे. विशेष मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त गृहनिर्माण सहकारी संस्थाना लाभ घेता यावा यासाठी तालुकास्तरावर सहायक निबंधक सहकारी संस्था यांना मार्गदर्शक म्हणुन नियुक्त करण्यात आले असून जिल्हा स्तरावर मार्गदर्शनासाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आला आहे.

            अधिक माहितीसाठी तालुकास्तरावर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा. तर जिल्हास्तरावरील मार्गदर्शनासाठी सहायक निबंधक निरज चौधरी (भ्रमणध्वनी क्रमांक 9423497725) यांचेशी संपर्क साधावा.