नंदुरबार (प्रतिनिधी) – ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या नंदुरबार जिल्हा युवक आघाडीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री सतीष काटके यांची निवड करण्यात आली आहे.
सामाजिक कार्याची आवड असलेले श्री सतीष काटके हे समाजाचे हित जोपासण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सतत योगदान देत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री प्रवीण काकडे यांच्या आदेशान्वये नाशिक विभागीय युवक आघाडी अध्यक्ष श्री शेखर कुवर यांच्या वतीने त्यांना सदरचे नियुक्त पत्र देण्यात आले आहे. ऑल इंडिया धनगर समाज महासंघ ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून उत्तर महाराष्ट्रातही या संघटनेने जोरदार घौडदौड उभारत संघटना वाढवली आहे.
संघटनेच्या वतीने श्री सतीष काटके यांची स्तुत्य निवड झाल्याबद्दल त्यांचे परिसरातील धनगर समाज बांधव , ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व मित्र परिवाराकडून कौतुक होत आहे.