नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एकल कलावंताना एकरकमी कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत प्रति कलाकार 5 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र कलाकारांना अर्ज सादर करण्यासाठी  31 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून अधिकाधिक कलाकारांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी,‍ डी.जी.नादगांवकर यांनी केले आहे

एकल कलाकाराच्या अर्थसहाय्यासाठी पात्रता व अटी : अर्जदार महाराष्ट्र राज्यातील प्रयोगात्मक कलेतील कलेवर गुजराण असणारा आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील कलाकार असावा. त्याचे महाराष्ट्र राज्यात 15 वर्षे वास्तव्य असावे, कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, वार्षिक उत्पन्न रुपये 48 हजारच्या कमाल मर्यादत असावे, केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय असणार नाही. उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बॅक खाते तपशिल, शिधापत्रिका विहीत नमुन्यातील अर्जासोबत जोडावीत.  योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्जाच्या नमुना जिल्हा समाज कल्याण अधिकारी, नंदुरबार व https://www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कलाकारांनी परिपुर्ण अर्ज भरुन संबंधित तहसिलदाराकडे सादर करावे. असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी,‍ डी.जी.नादगांवकर यांनी कळविले