नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग आस्थापना, व्यापारी, व्यावसायिक, कारखाने यांनी माहे ऑक्टोंबर2020 ते माहे डिसेंबर,2020 कालावधीत कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 दि.31 जानेवारी 2021 पर्यंत सादर करावे.

 सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा 1959 अनुसार वरील सर्व आस्थापनांनी मनुष्यबळाची त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. आस्थापनांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर युझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने आपल्या आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती भरावी.

यासंदर्भात काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड, तळ मजला रुम नं.27, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564- 210026) येथे संपर्क साधावा, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी कळविले आहे.