नंदुरबार (जगदीश ठाकुर)- केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करत आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात आलेल्या नवीन सरकारपुढे जुन्याच मागण्या घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या अंश कालीन स्त्री परीचराचे सरकारच्या आदेशानुसार मानधन वाढ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे परंतु नंदुरबार जिल्ह्यामध्ये अजूनही वाढीव रक्कम मिळालेली नाही तरी त्वरित त्याची अंमलबजावणी करून फरक रक्कम मिळावी
तसेच अशा वर्कर महिलांना दरमहा अठरा हजार रुपये व गटप्रवर्तक महिलांना दरमहा 21 हजार रुपये वेतन लागू करण्यात यावे. अशा विविध मागण्यांसाठी आयटक संलग्न अंशकालीन स्त्री परिचर संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यां द्वारे मार्च अखेर कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अस आश्वासन देण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.