नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित खाजगी अल्पसंख्यांक शाळा,कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देऊन शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी अनुदान योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून या योजनेतंर्गत सन 2022-2023 मध्ये अनुदान प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यातील इच्छूक शैक्षणिक संस्थांनी 7 ऑक्टोंबर 2015 च्या शासन निर्णय मधील अटी व शर्तींनुसार विहित नमुन्यातील अर्ज 31 जुलै 2022 पर्यंत जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.