नंदुरबार (प्रतिनिधी):- येथील निलेश मेडिकल या फर्मचे संचालक श्री अरविंद पाटील यांनी कोरोना या विषाणूंच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अकरा हजार रुपये रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात प्रयत्न केले जात आहेत. शासनाने या राष्ट्रीय आपत्तीमध्ये आर्थिक मदत करण्याचे जनतेला आवाहन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नंदुरबार येथील मेडिकल व्यवसायिक निलेश मेडिकल या फर्मचे संचालक श्री अरविंद पाटील यांनी मुख्यमंत्री मदत निधीसाठी अकरा हजार रुपये रक्कमेचा जनादेश नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत दैनिक खान्देश गौरवचे संपादक श्री हिरालाल चौधरी उपस्थित होते. अरविंद पाटील यांनी मदतीसाठी घेतलेल्या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. सर्व देशवासियांनी आपापल्या परीने प्रधानमंत्री सहायता कोष किंवा मुख्यमंत्री मदत निधीमध्ये मदत करण्याचे आवाहन अरविंद पाटील यांनी केले आहे.