नंदुरबार (प्रतिनिधी):- येथील सेवानिवृत्त कृषी सहायक व मूळचे आमोदे ता . शिरपूर , धुळे , येथील रहिवाशी श्री पी. के. पाटील यांचे चिरंजीव श्री . अमरजितसिंह प्रेमसिंह राजपूत यांना नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.
” अल्झायमर रोगाच्या उपचारासाठी नॅनोकारेरिस्ट सिस्टमचा विकास ” या संशोधन कार्यासाठी , इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी , निरमा युनिव्हर्सिटी , अहमदाबाद यांच्या कडून ही पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी डॉ . शितल बुटानी , सहयोगी प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन करण्यात आले. ते सध्या भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ( IIT Bombay ) येथे पोस्ट – डॉक्टरेट फेलो ( Post Doc Fellow ) या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता राजपूत यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई येथून २०१४ साली पीएचडी पूर्ण केली आहे. सध्या त्या जर्मन आधारित कंपनीत ( Merck Life Sciences , India ) मार्केटिंग मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. दोघेही श्री. पी. के. पाटील, सेवानिवृत्त कृषी सहाय्यक , नंदुरबार यांचे मुलगा व सून असून श्री. शैलेंद्र राजपूत , पोलिस नाईक , नंदुरबार यांचे भाऊ आणि भावजई आहेत.