नंदुरबार (प्रतिनिधी) : दोंडाईचा येथील अहिंसा तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी अभिजित भास्कर गिरासे याने बांधकाम पदविका या अभ्यासक्रमात तृतीय वर्षात यश संपादन केले असून त्यास ७४ टक्के गुण मिळाले असून त्याने घवघवीत यश संपादन केले आहे.
अभिजित गिरासे हा नंदुरबार येथील लक्ष्मीनारायण नगरमधील रहिवासी तथा दै.’पुण्यनगरी’चे भास्कर गिरासे व संगिता गिरासे यांचा मुलगा आहे. अभिजित याचे शिक्षण नंदुरबार येथील चावरा इंग्लिश मिडीयम येथे झाले आहे. दरम्यान, शालेय जीवनात अबॅकस या गणितातील परीक्षेत त्याने गोल्ड मेडल मिळविले आहे. पुढे बांधकाम क्षेत्रात पदवी करुन त्यात करीयर करण्याचा त्याचा मानस आहे.त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.