नंदुरबार (प्रतिनिधी):- कोरोणा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागु करण्यात आलेल्या 21 दिवासांच्या लॉक डाऊन दरम्यान बेघर, हातवरचे मजुर कामगार आणि रस्तावरचे अनाथांचे नाथ होण्यासाठी अनेक सामाजीक संस्था सरसावल्या असुन त्या विविध प्रकारे मदतीच हात देत आहेत. अशातलीच एक संस्था ही अस्तित्व फाऊडेशन असुन ती नंदुरबार शहरातील भुकेल्या आणि तहानलेल्याच्या पोटाला आधार देण्याचे काम करत आहे. विविध समाजाच्या चार मित्रांनी येवुन तयार केलेली फाऊडेशन काही महिलांच्या माध्यमातुन रोज अडीचशे ते तीनशे लोकांचे अन्न शिजवुन त्याचे शहरातील विविध ठिकाणी वाटप करत आहे. शहरातील एकही गरजु भुका राहुनये असा या अस्तित्व फाऊडेशनच्या सदस्यांचा मानस असुन यासाठी ते शहरातील अनेक दाणशुरांची देखील मदत घेत आहेत. जो पर्यत करोणा महामाही संकटामुळे ही परिस्थीती राहील तो पर्यत अस्तित्व फाऊडेशन मार्फत दिला जाणारा मदतीचा हात कायम अविरत सुरु ठेवण्याचा मानस देखील या फाऊडेशनने व्यक्त केला आहे. या उपक्रमाचे सध्या सर्वच स्तरावरुन कौतुक होतांना देखील दिसुन येत आहे.