नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 आजार नियंत्रणासाठी शासन आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, कोरोना विषयक मार्गदर्शक सूचना आणि शासनाने घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांची माहिती जनतेला देण्यासाठी  जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शहादा व अक्कलकुवा तालुक्यात पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.

अक्कलकुवा तालुक्यातील तहसिल कार्यालय, मुख्य बाजार, काकरपाडा, खापर, तसेच वाण्याविहीर येथे तर शहादा तालुक्यातील सारंगखेडा, मामाचे मोहिदे, कहाटुळ, व मंदाणे येथे पथनाट्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

शुक्रवार 22 जानेवारी 2021 रोजी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे, शनिमांडळ, रनाळे, दुधाळे, आष्टे, येथे पथनाट्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.